मुंबई : मुंबई महानगरपालिकेने ठिकठिकाणी सुरू केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’मध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या ३ फेब्रुवारी २०२३ रोजी तीन लाखापार पोहोचली होती. त्यानंतर २२ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रीपर्यंत म्हणजे अवघ्या १९ दिवसांमध्ये आणखी एक लाख रुग्णांनी वैद्यकीय उपचार घेतले असून ‘आपला दवाखान्यां’च्या लाभार्थ्यी रुग्णांची एकूण संख्या चार लाख पाच हजार ४२६ इतकी झाली आहे. आजघडीला मुंबईतील १०७ ठिकाणी हे दवाखाने सुरू आहेत.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही योजना १७ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरू झाल्यानंतर अवघ्या १३ दिवसांत, ३० नोव्हेंबरपर्यंत एक लाख रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर १ महिना ७ दिवसांनी म्हणजे ७ जानेवारी २०२३ रोजी दोन लाख, तर त्यानंतर २६ दिवसांनी म्हणजे ३ फेब्रुवारी २०२३ रोजी तीन लाख नागरिकांनी या दवाखान्यांमध्ये उपचार घेतले. आतापर्यंत या दवाखान्यांमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या चार लाखापार गेली आहे.

हेही वाचा >>> आयएएस अधिकाऱ्याचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू

२२ फेब्रुवारी २०२३ रोजीपर्यंत एकूण चार लाख पाच हजार ४२६ नागरिकांनी विविध वैद्यकीय सुविधांचा लाभ घेतला आहे. यापैकी दवाखान्यांमधून तीन लाख ८९ हजार ८३३ रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले आहेत. तर, पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्रात १५ हजार ५९३ रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ अशा उपचार सुविधांचा लाभ घेतला आहे.

हेही वाचा >>> मुंबई : म्हाडाच्या सदनिकेचे आमीष दाखवून २१ जणांची फसवणूक, दोन कोटी ३० लाखांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जी उत्तर विभागात सर्वाधिक रुग्ण तपासणी

‘आपला दवाखाना’ या योजनेमध्ये महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागात एकूण १५ दवाखाने आणि २ डायग्नोस्टिक केंद्र अशा १७ ठिकाणी आरोग्य सेवा पुरवली जात आहे. या १७ दवाखान्यांमधील लाभार्थी रुग्णांची संख्या तब्बल एक लाख चार हजार ७४६ इतकी आहे. जी उत्तर विभागामध्ये धारावीसारखा झोपडपट्टी बहुल परिसर आहे. या भागातील गरज लक्षात घेता अधिकाधिक नागरिकांना आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, अशा सूचना सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार दवाखाने सुरू करण्यात आले आहेत.