मधुमेह असलेल्या ६४ वर्षांच्या वृद्धाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. यामुळे ऑगस्टमधील मृत्यूंची संख्या दहावर गेली आहे. स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांची संख्या २३२९ वर पोहोचली आहे. वडाळा येथील ६४ वर्षांच्या व्यक्तीला धन्वंतरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी त्यांना वोकहार्ट रुग्णालयात हलवण्यात आले. स्वाइन फ्लूची शक्यता वाटल्याने १२ ऑगस्टपासून त्यांना ओसेल्टामिव्हीर गोळ्या देण्यास सुरुवात झाली. मात्र मधुमेह, उच्च रक्तदाब आणि दम्याचा विकार असलेल्या या वृद्धाचा १५ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. ऑगस्टच्या पहिल्या पंधरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या मृत्यूंमध्ये चार वृद्ध, दोन महिला व तीन मुलांचा समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Aug 2015 रोजी प्रकाशित
स्वाइन फ्लूमुळे आणखी एक मृत्यू
मधुमेह असलेल्या ६४ वर्षांच्या वृद्धाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. यामुळे ऑगस्टमधील मृत्यूंची संख्या दहावर गेली आहे.
First published on: 20-08-2015 at 01:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One more swine flu death reported