मुंबई : महागड्या मोटरगाड्या फोडून त्यात ठेवलेल्या वस्तू चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात वांद्रे पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या अटकेमुळे तीन गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक आरोपी मुंबईसह नवी मुंबई, पनवेल परिसरातही चोऱ्या करत होता.

बीएमडब्ल्यू मोटरगाडी फोडून त्यातून जवळपास २४ लाख ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरी करण्यात आली होती. हा प्रकार वांद्रे पोलिसांच्या हद्दीत असणाऱ्या लीलावती रुग्णालयासमोर ७ ऑक्टोबर रोजी घडला होता. याप्रकरणी मोटरगाडीचे चालक प्रतीक माहेश्वरी (३७) यांनी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – कोयना धरण परिसरात पर्यटन विकासाचा मार्ग  मोकळा; जलाशयसंबंधित कायद्यात बदल

हेही वाचा – जलविद्युत प्रकल्पांसाठी नवे धोरण; खासगी सहभागाला प्रोत्साहन; मंत्रिमंडळाचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपासाअंती पोलिसांनी अभिमन्यू अर्जुन गुप्ता उर्फ रिंकू (३१) याला अटक केली. चोरलेला सर्व मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला आहे. रिंकूने पनवेल शहर, नौपाडा तसेच एमपीएससी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली मोटरसायकल, दोन लॅपटॉप आणि एक मोबाईल ताब्यात घेऊन तीन गुन्हे उघडकीस आणण्यातही पोलीस निरीक्षक विजय आचरेकर, फौजदार रमेश पेडणेकर, हवालदार राजू तोडगे, शिपाई सांगवे, गायकवाड, चतुर आणि लहाने यांना यश मिळाले आहे.