मुंबई : मालाड पश्चिम येथील मामलेदार वाडी जंक्शनजवळ बुधवारी सकाळी झाड उन्मळून पडले. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मामलेदार वाडी जंक्शन जवळ बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कौशल दोषी यांच्या अंगावर झाड कोसळले. गंभीर जखमी झालेल्या  कौशल यांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत झाल्याचे घोषित केले.