ऑनलाईन विस्कीची बाटली मागवणं मुंबईतील एका महिलेला चांगलच महागात पडलं आहे. या महिलेला सायबर गुन्हेगारांनी तब्बल ५ लाख ३५ हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन बोरिवली पश्चिमेतील एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केक सजवण्यासाठी ऑनलाईन विस्की मागवण्याच्या प्रयत्नात ही फसवणूक झाल्याची माहिती महिलेनं पोलिसांना दिली आहे.

अखेर कांदळवन कक्षाला आली जाग ; जुहू, गिरगाव, वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर ‘ब्लू बॉटल’पासून खबरदारीचे फलक

दहिसरच्या ‘सिल्वर वाईन्स’ या दुकानाच्या बनावट फोन क्रमाकांवर कॉल करून या महिलेनं विस्कीच्या बाटलीची मागणी केली होती. या क्रमाकांचा वापर सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणुकीसाठी करण्यात येत होता. अशाच एका सायबर गुन्हेगाराने या महिलेचा फोन उचलला. या आरोपीनं दुकानाचा कर्मचारी असल्याचे भासवून महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दुकान बंद असल्याची बतावणी करत विस्कीची होम डिलिव्हरी करण्यास या महिलेला सांगितलं. तक्रारदार महिलेनं यासाठी ५५० रुपयांचं ऑनलाईन पेमेंट देखील केलं. त्यानंतर एका दुसऱ्या सायबर गुन्हेगारानं महिलेला कॉल करुन विस्कीच्या होम डिलिव्हरीसाठी नोंदणी करण्यास सांगितलं. महिलेनं ही नोंदणी करण्यास विरोध केल्यानंतर आणखी एका सायबर गुन्हेगाराचा महिलेला फोन आला. ऑनलाईन विस्कीचा पावती क्रमांक १९०५१ असून ऑनलाईन पैसे भरताना हाच क्रमांक टाकण्यास सायबर गुन्हेगाराकडून महिलेला सांगण्यात आलं. हा क्रमांक टाकताच महिलेच्या खात्यातून १९ हजार ५१ रुपये वजा झाले.

मुंबई अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारीपद प्रथमच महिलांकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकाऊंटवरून पैसे वजा झाल्यानंतर या महिलेनं कॉल करुन सायबर गुन्हेगाराला याबाबत विचारणा केली. तेव्हा हा एक तांत्रिक दोष असल्याचं सांगून पैसे लगेच परत करतो, असं या गुन्हेगारानं महिलेला सांगितले. पैसे परत मिळवण्यासाठी महिलेला या गुन्हेगारानं आणखी एक ऑनलाईन व्यवहार करायला सांगितला. या व्यवहारात या महिलेनं आणखी ३८ हजार १०२ रुपये गमावले. सायबर गुन्हेगारांनी या महिलेकडून डेबिड कार्डची माहिती मिळवून याद्वारे तब्बल २ लाखांची फसवणूक केली. अशाचप्रकारे सायबर गुन्हेगारांनी या महिलेला तब्बल ५ लाख ३५ हजार रुपयांचे व्यवहार करण्यास भाग पाडले. या व्यवहारातून आपली फसवणूक झाल्याचे कळताच महिलेनं पोलिसात धाव घेतली.