‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेची ठाणे विभागीय अंतिम फेरी आज
राज्यभरातील तरुणाईच्या विचारस्पंदनांना आव्हान देणाऱ्या ‘लोकसत्ता’ आयोजित ‘वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या विभागीय अंतिम फे रीची धामधूम सुरू झाली आहे. राज्यभरातील तरुण विचारवंतांमधून ‘वक्ता दशसहस्रेषु’ कोण होणार? याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही केंद्रांवरची प्राथमिक फेरी पूर्ण झाली असून आता विभागीय अंतिम फेरीला शनिवारपासून सुरुवात होते आहे. ठाण्यात आजपासून, तर मुंबईत रविवार, ५ फेब्रुवारी रोजी विभागीय अंतिम फेरी रंगणार आहे.
महाराष्ट्राला तेजस्वी वक्त्यांची असलेली परंपरा लक्षात घेत समाजमन घडवणाऱ्या या वक्तृत्व क लेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘लोकसत्ता’ आयोजित, ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत व ‘पॉवर्ड बाय’ बॅंक ऑफ महाराष्ट्र, दि विश्वेश्वर को-ऑ. बॅंक लिमिटेड, ‘आयसीडी’ (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट – औरंगाबाद), ‘एमआयटी’ (औरंगाबाद) असलेल्या ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ या स्पर्धेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एक स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वालाही विद्यार्थ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ठाणे विभागाच्या प्राथमिक फेरीत ४५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, तर मुंबईच्या प्राथमिक फेरीत ४३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दोन्ही विभागाच्या प्राथमिक फेरीतून प्रत्येकी आठ-आठ स्पर्धकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. या विभागीय अंतिम फेरीत विजेता ठरणारा स्पर्धक त्या त्या विभागाचे महाअंतिम फेरीत प्रतिनिधित्व क रणार आहे.
श्रोत्यांना विनामूल्य प्रवेश
ठाणे विभागीय अंतिम फेरी शनिवारी, ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कात्यायन हॉल, तिसरा मजला, इमारत क्रमांक-५, जोशी-बेडेकर महाविद्यालय, चेंदणी बंदर रस्ता, ठाणे (पूर्व) येथे, तर मुंबई विभागीय अंतिम फेरी रविवार, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता केशवराव घैसास सभागृह, म. ल. डहाणूकर महाविद्यालयाजवळ, विलेपार्ले (पूर्व) येथे होणार आहे. दोन्ही विभागीय अंतिम फेरीतील स्पर्धकांची भाषणे ऐकण्यासाठी श्रोत्यांना विनामूल्य प्रवेश आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर हा प्रवेश देण्यात येणार असून काही जागा राखीव असणार आहेत.
प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘द विश्वेश्वर को-ऑ. बँक लिमिटेड’, ‘आयसीडी’ (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट), ‘एमआयटी’