मुंबईत हिवताप, स्वाईन फ्लू, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरात लेप्टोचे १५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर स्वाईन फ्लूच्या नवीन २० रुग्णांची नोंद झाली आहे. हिवतापाचेही २०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत.

हेही वाचा >>> मुंबई : प्रवाशांना मुजोर टॅक्सी चालकांविरोधात तक्रार करता येणार

मुंबईत करोनाबरोबरच इतर आजारांचे प्रमाण वाढले आहे. पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव वाढतच आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यातही सर्वच आजारांचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. हिवताप, लेप्टो, डेंग्यू, गॅस्ट्रो, कावीळच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ऑगस्टच्या चौथ्या आठवड्यातही तशीच परिस्थिती आहे. हिवताप , स्वाईन फ्लू, डेंग्यू या आजारांच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १८३ रुग्ण आढळले आहेत. तर हिवतापाच्या रुग्णांची आतापर्यंतची संख्या ७३६ झाली आहे.

जुलै महिन्याच्या तुलनेत हिवताप, डेंग्यू आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जुलैमध्ये डेंग्यूचे ६१ रुग्ण आढळले होते तर ऑगस्ट मध्ये आतापर्यंत हीच संख्या १४७ झाली आहे.

हेही वाचा >>> “विघ्नहर्त्याने राज्यावरील बरीचशी विघ्नं आता दूर केली, त्यामुळे…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टोलेबाजी

स्वाईन फ्लूची लक्षणे

सर्वसामान्यत: स्वाइन फ्लू हा आजार किरकोळ सर्दी-खोकल्याचा आजार आहे. तीव्र ताप, कोरडा खोकला, नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे, घशामध्ये खवखव होणे, थकवा आणि काही वेळेस जुलाब किंवा पोटदुखी अशी लक्षणे या आजारात दिसतात. सर्वसाधारणपणे चार ते पाच दिवसांत हा आजार बहुसंख्य लोकांमध्ये स्वत:हूनच बरा होतो. काहीच व्यक्तींमध्ये हा उग्र स्वरूप धारण करतो. गुंतागुंतीच्या आजारात मात्र काही विशिष्ट लक्षणे दिसतात. याला सूचक किंवा धोकादायक लक्षणे म्हणतात. यात छातीत दुखणे, खोकताना रक्त पडणे, दम लागणे, अतितीव्र ताप, शुष्कता (डिहायड्रेशन), बेशुद्धावस्था ही लक्षणे दिसायला लागतात.

आजार ……ऑगस्ट महिन्यातील रुग्ण…..जानेवारीपासून आतापर्यंतचे एकूण रुग्ण

हिवताप(मलेरीया) …..….७३६ ………….२५४२

लेप्टो …………………………६१………….१६१

डेंग्यू ……………………….१४७ … ……….३३१

गॅस्टो ……………………..४४४….. ……….४०२९

कावीळ (हेपेटायटीस) …….५१…………….३६९

चिकुनगुन्या ………………३…………….१०

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वाईन फ्लू ………………१८३…………..२९२