नांदेड लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना ‘पेडन्यूज’ प्रकरणी न्यायालयाकडून आठवड्याभराचा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता येत्या शुक्रवारी होणार आहे. त्यामुळे चव्हाण यांच्यावरील अपात्रतेची टांगती तलवार अजूनही कायम आहे.
चव्हाणांसह नांदेडचे काँग्रेस आमदारही अडचणीत
अशोक चव्हाण आज(शुक्रवार) पेडन्यूज प्रकरणाच्या सुनावणीसाठी निवडणूक आयोगासमोर हजर झाले होते. दरम्यान, यावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून येत्या शुक्रवारी चव्हाण यांचे भवितव्य ठरणार आहे. निवडणूक आयोगाने चव्हाण यांना पेडन्यूज प्रकरणी दोषी ठरविल्यास त्यांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता आहे.
चव्हाण यांचा आमदारकीचा राजीनामा
२००९ साली विधानसभा निवडणूकीत अशोक चव्हाण यांनी भोकर मतदार संघातून निवडणूक लढविली होती. त्यावेळी ‘अशोकपर्व’ नावाच्या पुरवण्यांच्या माध्यमातून पेडन्यूज छापून आणल्याचा ठपका चव्हाण यांच्यावर आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या निवडणूक खर्चात त्याचा उल्लेख न केल्याने प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ.माधव किन्हाळकरांनी निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती.