मुंबई : मुलुंड येथील एका न्यायदालनातील फायलींच्या ढिगाऱ्यावर मंगळवारी साप आढळून आला आणि न्यायालयाच्या परिसरात घबराट पसरली. या घटनेमुळे सुमारे तासभर न्यायालयीन कामकाज विस्कळीत झाले होते. सर्पमित्रांनी सापाचा शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही. अखेर तासभर खोळंबलेले न्यायालयीन कामकाज पुन्हा सुरळीत झाले.

मुलुंड येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या २७ क्रमांकाच्या न्यायदालनात मंगळवारी दुपारपर्यंत नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. परंतु, एक पोलीस कर्मचारी प्रकरणाशी संबंधित फाईल शोधत असताना त्याला फायलींच्या ढिगाऱ्यावर दोन फूट लांबीचा साप आढळला. या घटनेमुळे न्यायदालनात उपस्थितांमध्ये घबराट पसरली आणि न्यायाधीशांनीही तात्पुरते कामकाज तहकूब केले. त्यानंतर, सर्पमित्र संघटनेच्या सदस्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी सापाचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. न्यायदालनातील एका भोकातून हा साप न्यायालयात आला असावा, असे एका वकिलाने घटनेनंतर सांगितले.

हेही वाचा – जानेवारी ते मार्चदरम्यान ‘पाणलोट रथयात्रा’, जनजागृतीसाठी जलसंधारण विभागाचा पुढाकार

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या १२ जणांविरोधात गुन्हा, महाराष्ट्र सायबर पोलिसांची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलुंड न्यायदंडाधिकारी न्यायालय झाडांनी वेढलेले असून न्यायदालनात साप दिसणे ही काही दुर्मीळ घटना नाही. याआधीही न्यायदालनाच्या खिडकीवर साप दिसला होता. दोन महिन्यांपूर्वी न्यायाधीशांच्या दालनातही साप आढळला होता, असेही न्यायदालनात उपस्थित वकिलांनी सांगितले.