पनवेल – कल्याण एसटी बसला आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तळोजा येथील नावडा फाटा येथे ट्रकने समोरून दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात एसटीमधील नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कल्याण करून पनवेलकडे प्रवासी घेऊन एसटी बस (एमएच-०७-सी- ७४८५) निघाली होती. नावडा फाटा येथे एका वळणावर समोरून आलेल्या ट्रकने अचानक जोरदार धडक दिली. यात असलेले प्रवासी सीट आणि खिडक्यांवर आदळल्याने त्यांना किरकोळ दुखापती झाल्या. या अपघाताची तळोजा पोलिसांनी नोंद केली आहे.