मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शहरातील काही प्रभागांमध्ये पुढील काही तासांसाठी संपूर्ण पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. परळच्या काही भागात उद्या म्हणजेच ५ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान ही पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या वेळेत महापालिकेच्या एफ दक्षिण प्रभागातील परळ, काळेवाडी, नायगाव भागाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी काही तांत्रिक कामं हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे, यादरम्यान पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने मुंबईकरांना पाणी जपून वापण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मंगळवार ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजपासून ते बुधवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत परळच्या काही भागातील पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

महापालिकेच्या सूचना

“ज्या वेळेत पाणीपुरवठा बंद असेल त्या वेळेत गोलंजी टेकडी जलाशयाच्या आतील परिसरातील ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची व ४५० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्यात येणार आहे. तर एफ दक्षिण विभागात पाणी पुरवठा करणाऱ्या ४५० मिलीमीटर व्यासाच्या २ जलवाहिन्या काढून टाकण्यात करण्यात येणार आहेत. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे”, अशी माहिती महानगरपालिकेने दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parel to face 24 hour water cut on october 5 gst
First published on: 04-10-2021 at 12:42 IST