काही दिवसांपूर्वी मुंबईतील जुहू चौपाटीवर फिरायला गेलेली ५ मुलं समुद्रात बुडाली होती. यातील एकाला वाचविण्यात यश आलं होतं. तर, ४ जण बेपत्ता झाले होते. त्यानंतर चार जणांचे मृतदेह कोळीवाडा परिसरात आढळून आले. ही घटना ताजी असताना जुहू बीच परिसरात आणखी दोन मुलं बुडाल्याची घटना घडली. पण सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या एका हवालदारामुळे दोन्ही मुलांचे प्राण वाचले आहेत.

जुहू बीच येथे बुडणाऱ्या दोन्ही मुलांना सुखरुपणे समुद्रातून बाहेर काढलं आहे. सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे हवालदार विष्णू भाऊराव बेळे यांनी जुहू बीच येथे समुद्रातून बुडणाऱ्या ७ आणि १० वयोगटातील दोन मुलांना सुखरूप बाहेर काढले. संबंधित मुलांना पालकांच्या ताब्यात दिलं आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

हेही वाचा- जुहू चौपाटीजवळील समुद्रात ५ मुलं बुडाली, एकाला वाचवण्यात यश; चार जणांचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संबंधित बुडणाऱ्या मुलांना समुद्रातून बाहेर काढतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे हवालदार विष्णू भाऊराव बेळे यांनी प्रसंगावधान दाखवत दोन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढलं आहे. ‘एएनआय’ने बचाव कार्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.