मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जालना – मुंबई संभाव्य पदयात्रा आणि त्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान सर्व अधिकारी, अंमलदारांच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि अन्य रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – चंद्रपूर आणि गडचिरोलीतील प्रकल्पांचे पुढे काय झाले? गेल्या वर्षी दावोसमध्ये झालेल्या करारांबाबत अनिल देशमुख यांचा सवाल

हेही वाचा – गोष्ट मुंबईची! भाग १४३ : समुद्रात भराव घालून उभे राहिले ‘हे’ रेल्वे स्थानक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी जालना – मुंबई दरम्यान पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक बंदोबस्तासाठी २० जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या साप्ताहिक सुट्यासह सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये वैद्यकीय रजा वगळण्यात आली आहे. साप्ताहिक सुट्ट्या रद्द करताना शासन निर्णयाचे पालन करावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके यांनी याबाबतचे परिपत्रक शुक्रवारी जारी केले.