मुंबई : राज्यातील पोलीस निरीक्षक व सहाय्यक निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या मंगळवारी करण्यात आल्या. पोलीस महासंचालक कार्यालयातून या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले.आंतरजिल्हा बदलीसाठी अनेक अधिकाऱ्यांनी अर्ज केले होते. अर्ज केलेले अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत होते. त्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश मंगळवारी पोलीस महांसचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आले. त्यानुसार ५०३ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ३७० पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या.

यामध्ये विनंती बदल्यांचाही समावेश आहे. त्याअंतर्गत मुंबई पोलीस दलात इतर जिल्ह्यातून अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सचिन माने, सुनील सिंह पवार, चंद्रकांत सरोदे, रवींद्र वाणी, दादसाहेब घुटुकडे, राकेश मानगावकर आदी पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.