मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर बुधवारी सेवा निवृत्त होत असल्यामुळे त्याच्या जागी विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय पोलीस सेवेच्या १९९४ तुकडीचे अधिकारी असलेले भारती यांना मुंबई पोलीस दलात काम करण्याचा दांडगा अनुभव आहे.

देवेन भारती १९९४ च्या तुकडीतील पोलीस अधिकारी आहेत. यापूर्वी ते मुंबई पोलीस दलात सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आणि एटीएस प्रमुखपद अशा महत्त्वाच्याच पदांवर कार्यरत होते. याशिवाय मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. ठाकरे सरकारमध्ये ३ सप्टेंबर २०२० रोजी देवेन भारती यांची एटीएसच्या प्रमुखपदावरून बदली करण्यात आली होती. अखेर सव्वा महिन्यानंतर त्यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या दोन वर्षांपासून ते मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी कार्यरत होते. आता त्यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचा आदेश गृह विभागाने बुधवारी जारी केला. ते बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारतील.