मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी तीन वर्षे कालावधीच्या पूर्णवेळ पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान/वास्तुकला अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना १६ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
इयत्ता दहावीचा निकाल १३ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाल्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून २० मे पासून https:// poly25. dtemaharashtra. gov. in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
प्रवेश अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास ती दूर करण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाकडून ७६६९१००२५७/ १८००३१३२१६४ हा मदत क्रमांक सुरू करण्यात आला आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत त्यावर संपर्क साधता येईल.
अंतिम यादी २३ जूनला
● ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे – २० मे ते १६ जून
● प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे – २० मे ते १६ जून
● तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे – १८ जून
● तात्पुरत्या गुणवत्ता यादीसंदर्भात हरकत सादर करणे – १९ ते २१ जून
● अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे – २३ जून