मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या ३० जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी असलेल्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

विधि, अभियांत्रिकी, एमएससी चौथे सत्र, वाणिज्य एमकॉम भाग एक आणि अन्य संबंधित अभ्यासक्रमांच्या एकूण ३० परीक्षा या ३० जानेवारी २०२३ रोजी घेण्यात येणार होत्या. परंतु पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीमुळे मानवता विषयाच्या पदव्युत्तर पदवी (एमए) सत्र तिसरे, विधि अभ्यासक्रमाचे सत्र दुसरे, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे सत्र तिसरे, विज्ञान शाखेच्या एमएससी सत्र चौथे, एम एससी भाग दोन, वाणिज्य शाखेच्या, एमकॉम भाग दोन या परीक्षा ३० जानेवारी रोजी नियोजित होत्या. मात्र आता त्या ७ फेब्रुवारी २०२३ पासून घेण्यात येणार आहेत असे विद्यापीठाने जाहीर केले आहे.