पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी शीत डांबरमिश्रीत खडी (कोल्ड मिक्स) कुचकामी ठरू लागल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने आता नवीन तंत्रज्ञानाची चाचपणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने आज (शुक्रवार) चार ठिकाणी नवीन अभियांत्रिकी पद्धतींची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी केली.

गेल्या काही दिवसात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील डांबरी रस्ते खड्डेमय झाले. पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवल्यानंतर कोसळणारा पाऊस आणि वाहतुकीचा ताण यामुळे रस्ते पुन्हा खड्डेमय होतात. तसेच कोल्डमिक्सचे मिश्रण खड्ड्यातून बाहेर येत असल्यामुळे ते खड्डे बुजवण्यास योग्य नसल्याची टीका होत आहे. त्यामुळे सध्याच्या तंत्रज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेऊन खड्डे बुजवण्यासाठी नवीन अभियांत्रिकी पद्धतींची चाचपणी करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले होते. त्यानुसार नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करण्यात येणार आहे.

या ठिकाणी होईल चाचणी –

१) पूर्व मुक्त मार्गाच्या खालील दया शंकर चौक ते मुंबई पोर्ट ट्रस्ट टोल, स्तंभ क्रमांक ३३३ जवळ
तंत्रज्ञान – रॅपिड हार्डिंग काँक्रीट

२) पूर्व मुक्त मार्गाच्या खाली दया शंकर चौक ते मुंबई पोर्ट ट्रस्ट टोल, स्तंभ क्रमांक ३३४ जवळ
तंत्रज्ञान – एम ६० काँक्रीट भरून त्यावर स्टील प्लेट बसविणे

३) दया शंकर चौकाच्या अगोदर –
तंत्रज्ञान- पेवर ब्लॉक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४) आणिक वडाळा मार्गावर भक्ती पार्क जंक्शन / अजमेरा जंक्शन
तंत्रज्ञान – जिओ पॉलिमर