वीजमागणीचा या उन्हाळय़ातील उच्चांक आता जून महिन्यात नोंदवला गेला असून मुंबईत ३३६५ मेगावॉट विजेची मागणी नोंदवली गेली. मागच्या वर्षी ३२१२ मेगावॉट कमाल मागणी नोंदवली गेली होती. वाढलेले तापमान, हवेतील दमटपणा यामुळे वातानुकूलन यंत्रणा, पंखे यासारख्या विद्युत उपकरणांचा वापर मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. १० जून रोजी दुपारी पावणे चार वाजता उन्हाळय़ातील विक्रमी ३३६५ मेगावॉट विजेची मागणी नोंदवली गेली. ती मागच्या वर्षीच्या ३२१२ मेगावॉटच्या तुलनेत पाच टक्क्यांनी जास्त आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jun 2014 रोजी प्रकाशित
उकाडय़ामुळे वीजमागणीचा उच्चांक
वीजमागणीचा या उन्हाळय़ातील उच्चांक आता जून महिन्यात नोंदवला गेला असून मुंबईत ३३६५ मेगावॉट विजेची मागणी नोंदवली गेली.
First published on: 13-06-2014 at 06:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power demand raised