खासगी कंपन्यांकडून वीजपुरवठा कमी झाल्याने राज्यात वीजटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून, सुमारे तीन हजार मेगावॉट विजेची कमतरता शनिवारी जाणवत होती. परिणामी शहरी भागातील भारनियमन वाढवावे लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोळसा खाणींचे वाटप बेकायदा ठरविलेले असतानाच दराच्या मुद्दय़ावर काही खासगी वीज कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुरेसा कोळसा उपलब्ध नसल्याने वीजनिर्मिती प्रकल्पांवर परिणाम झाला आहे. ऐन गणेशोत्सव तसेच निवडणूक जवळ आली असताना राज्यात भारनियमन वाढणे सत्ताधाऱ्यांना परवडणारे नाही. म्हणूनच राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री पियुश गोयल आणि अदानीचे गौतम अदानी यांच्याशी चर्चा केली.
संग्रहित लेख, दिनांक 31st Aug 2014 रोजी प्रकाशित
तीन हजार मेगावॉटची कमतरता; विजेचे भारनियमन वाढले
खासगी कंपन्यांकडून वीजपुरवठा कमी झाल्याने राज्यात वीजटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून, सुमारे तीन हजार मेगावॉट विजेची कमतरता शनिवारी जाणवत होती.
First published on: 31-08-2014 at 04:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power load shedding rise