मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २५ नोव्हेंबरला मुंबईत शिवाजी पार्कवर संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना तसे पत्र पाठविले आहे.  देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला २५ नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवाजी पार्कवर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> उपनगरांतील पुनर्विकास महाग;‘धारावी टीडीआर’चा विकासकांना फटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सभेला उपस्थित राहण्यासाठी राहुल गांधी यांना खास निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. सध्या देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप संविधानिक मूल्ये आणि आदर्श नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याशी लढण्याच्या आपल्या दोघांच्या वचनबद्धतेच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या आधारावरून, वंचित बहुजन आघाडी या माझ्या पक्षाच्या वतीने तुम्हाला संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण देतो, या निमित्ताने तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो लोकांना संबोधित करण्याची आणि भारताच्या भविष्याबद्दलचा तुमचा दृष्टिकोन, भूमिका मांडण्याची संधी मिळेल, असे या पत्रात म्हटले आहे.