नाट्यगृह उभारणे सोप्पे आहे; परंतु त्याची देखभाल करणे अवघड आहे. नाट्यगृहाच्या विज बिलापोटी मोठी रक्कम खर्च करावी लागते. ही बाब विचारात घेऊन पंतप्रधान सौर उर्जा योजनेतून राज्यातील ४८ नाट्यगृहांना मदत करावी, अशी मागणी अभिनेते प्रशांत दामले यांनी केली. यासाठी दामले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांना साकडे घातले आहे.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी पार पडली. या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह गटा’ने बाजी मारली. या पार्श्वभूमीवर दामले यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.

नाट्यगृहांचे भाडे कमी करावे अशी मागणी निर्माते सातत्याने मुंबई महानगरपालिकेकडे करीत असतात. या प्रश्नावर कायम स्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारने नाट्यसृष्टीला मदतीचा हात दिल्यास दिलासा मिळू शकेल, असा आशावाद दामले यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>राष्ट्रवादी काँग्रेसमधील ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्या घेतल्या? अजित पवार स्पष्टीकरण देत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कलाकार अभिनय कौशल्य सादर करण्यासाठी मुंबईत येत असतात. या कलाकारांना मुंबईतील घराचे भाडे परवडत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या अनेक शाळा बंद पडल्या आहेत. या शाळांची दुरुस्ती करून त्या या कलावंतांना निवाऱ्यासाठी उपलब्ध केल्यास त्यांना दिलासा मिळेल, अशी मागणीही प्रशांत दामले यांनी केली.