मुंबई : विमानतळाप्रमाणेच दर्जेदार असे पनवेल बस स्थानक बांधण्याच्या निर्णयाचा एसटी महामंडळाला विसर पडला असून सहा वर्षे उलटूनही यासाठी एकही वीट रचली नाही. त्यामुळे पनवेल प्रवासी संघाने ३ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्याची हाक दिली आहे. या आंदोलनाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीही पाठिंबा दिल्याचा दावा प्रवासी संघाने केला आहे.

 खर्चाच्या मुद्दय़ासह ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’अंतर्गत या बांधण्याचे नियोजन, त्यासाठीच्या अटी व शर्तीमध्ये वारंवार केलेले बदल यामुळे हा नवीन स्थानकाचा प्रकल्प मागे पडला. त्यातच मार्च २०२० पासून करोनाचा संसर्ग आणि निर्बंधांमुळेही आणखी विलंब झाला. 

हेही वाचा >>> अडीच फूट उंची असणाऱ्या अझीमचं ठरलं लग्न! आता थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्रींनाच देणार लग्नाचं आमंत्रण

 एसटी महामंडळ आणि पनवेल महापालिकेच्या संथ कारभाराविरोधात पनवेल प्रवासी संघाने येत्या ३ नोव्हेंबरला आंदोलनाची हाक दिली आहे. हे आंदोलन एसटीच्या पनवेल बस स्थानकात सकाळी १० वाजता होणार आहे, असे पनवेल प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तीकुमार दवे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पनवेल बस स्थानकाचा आराखडा तयार झाला असून नेमलेल्या सल्लागाराकडून एसटी महामंडळाला सादर करण्यात येणार आहे. त्याला मंजुरी मिळताच सल्लागार आणि बस स्थानक विकासकाकडून पनवेल महापालिकेला आराखडा सादर करून मंजुरी घेण्यात येणार आहे, असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.