काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे ‘हॉटलाईन ब्लिंग’ आणि ‘अपटाऊन फंक’ ही प्रसिध्द गाणी गाताना दिसले होते. अर्थात, त्यांनी ती गाणी सलग गायली नव्हती तर या गाण्यांवर त्यांच्या वेगवेगळ्या भाषणातील शब्दांच्या सहाय्याने केले गेलेले ते विडंबन काव्य होते. ऑलनाईन जगतात या गाण्यांना खूप प्रसिध्दी मिळाली होती.
त्याच धर्तीवर आता ‘ऑफिशिअल पिईंग ह्युमन’ या फेसबुक पेजने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे एकत्रिक करून बॉलीवूडमधील एका प्रसिध्द गाण्यावर विडंबनपर गाणे तयार केले आहे.
या विडंबनपर गाण्यात नरेंद्र मोदी हे आमिर खानच्या ‘पीके’ ह्या चित्रपटातील ‘लव्ह इज वेस्ट ऑफ टाईम’ हे गाणे गाताना दाखवण्यात आले आहेत. मोदी यांच्या देशातील आणि परदेशातील भाषणातील काही निवडक शब्द एकत्रिक करून हे अतिशय खुमासदार आणि विनोदी गाणे तयार करण्यात आले आहे. हे गाणे नक्की काय आहे आणि त्यातील शब्दांची जुळवाजुळव कशी केली आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला एकदातरी हा व्हिडिओ पाहायलाच हवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi is singing love is a waste of time
First published on: 27-07-2016 at 16:59 IST