मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या (टीस) कुलपतीपदी प्राध्यापक धीरेंद्र पाल सिंग यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. धीरेंद्र पाल सिंग यांनी भारतातील उच्च शिक्षणासंदर्भातील शिखर संस्था असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून २०१८ ते २०२१ या कालावधीत कार्यभार सांभाळला आहे. प्राध्यापक सिंग यांनी जवळपास चार दशके भारतीय उच्च शिक्षणातील अनेक महत्त्वपूर्ण शैक्षणिक पदे भूषवली आहेत.

त्यांनी वाराणसीमधील बनारस हिंदू विद्यापीठ, सागर येथील डॉ. एच. एस. गौर विद्यापीठ आणि इंदौरमधील देवी अहिल्या विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषवले आहे. बंगळूरू येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेचे संचालक म्हणूनही काम केले आहे.

हेही वाचा…धुळे, ठाणे, वर्ध्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ, राज्यात उष्माघाताचे १८४ रुग्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ (सीएबीई), भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर), युनेस्को व रुसासह भारतीय राष्ट्रीय सहकार आयोग, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी समिती इत्यादींचे पदसिद्ध सदस्य म्हणून योगदान दिले आहे.