लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गोरेगावमधील मोतीलाल नगरच्या धर्तीवर अभ्युदयनगर, आदर्शनगर आणि वांद्रे रेक्लेमेशन या तीन म्हाडा अभिन्यासांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार, या तिन्ही प्रकल्पांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. सरकारने अभ्युदयनगर पुनर्विकासाला मान्यता दिली असून सध्या या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. असे असतानाच आदर्श नगर आणि वांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकास प्रकल्पाचे प्रस्ताव मात्र लालफितीत अडकले आहेत.

Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय?
Municipal Corporation Election, Pimpri Chinchwad ,
पिंपरी चिंचवड : “महानगरपालिकेत २०१७ ची पुनरावृत्ती होणार”, शंकर जगताप काय म्हणाले?
mhadas tender for Abhudayanagar redevelopment at Kalachowki
अभ्युदयनगर पुनर्विकासासाठी म्हाडाला विकासक मिळेना, प्रतिसादाअभावी चौथ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्कीच
Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
Conditional possession to eligible tenants on comprehensive list decision of MHADA Vice Chairman
बृहतसूचीवरील पात्र भाडेकरुंना सशर्त ताबा, म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय
Ramsar Conservation Court Public Interest Litigation filed by High Court
रामसर संवर्धन न्यायालयाकडे; उच्च न्यायालयाकडून जनहित याचिका दाखल

मंडळाला या दोन्ही प्रकल्पांच्या प्रस्तावाच्या मान्यतेची प्रतीक्षा असून यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आता नवीन सरकारकडून या दोन्ही प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला, जाईल अशी अपेक्षाही आहे.

आणखी वाचा-तीन वर्षांत २४७ अपघात; ‘बेस्ट’च्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या सर्वाधिक दुर्घटना

काळाचौकी येथील ३३ एकर जागेवरील आणि ३४१० सदनिकांचा समावेश असलेल्या अभ्युदयनगर वसाहतीचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडला होता. हा पुनर्विकास मार्गी लागत नसल्याने अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाने पुढाकार घेऊन मोतीलाल नगरच्या धर्तीवर खासगी विकासकाची (कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेन्ट एजन्सी) नियुक्ती करून हा पुनर्विकास मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही प्रकल्पास मान्यता मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकल्पासाठी सुरुवातीपासून राज्य सरकार सकारात्मक आहे. आता नवीन सराकरकडेही पाठपुरावा करण्यात येणार आहे. नवीन सरकार या प्रस्तावास मान्यता देईल, अशी आशा म्हाडाला असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा-राज्यात प्रथमच ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीची १२ महाविद्यालये

अभ्युदयनगरच्या प्रस्तावाला मान्यता

अभ्युदय नगरबरोबरच वरळीतील आदर्शनगर आणि वांद्रे पश्चिम येथील वांद्रे रेक्लेमेशन वसाहतीचाही पुनर्विकास याच धर्तीवर करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. या तिन्ही वसाहतींच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव तयार करून ते मंजुरीसाठी सरकारकडे पाठविले. राज्य सरकारने अभ्युदयनगरच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून सध्या यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. पण त्याचवेळी आदर्शनगर आणि वांद्रे रेक्लेमशनचे प्रस्ताव मात्र आजही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

Story img Loader