मुंबई: मुलुंडमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी घर बांधणी प्रकल्पाला (पीएपी) मुलुडकरांनी कडाडून विरोध केला असून गेल्या चार दिवसांपासून नागरिकांनी येथे साखळी उपोषण सुरू केले आहे. शासनाला जाग आणण्यासाठी सोमवारी आंदोलकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले.

विविध प्रकल्पात बाधित होणाऱ्या नागरिकांसाठी महापालिका मुलंड गाव परिसरातील रिकाम्या भूखंडावर ७ हजार ४३९ घरांचा प्रकल्प उभारत आहे. एकीकडे मुलुंडमध्ये नागरी सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. त्यातच येथे इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांचे स्थलांतर झाल्यास सरकारी यंत्रणा आणि मूलभूत सुविधांवर प्रचंड ताण येईल. त्यामुळे मुलुंडकरांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी, मुलुंडमधील नागरिक या प्रकल्पाला विरोध करीत आहेत.

हेही वाचा >>>प्रथम व द्वितीय वर्षाचे गुण वेळेत भरा; मुंबई विद्यापीठाची महाविद्यालयांना सूचना, निकालानंतर प्रति विद्यार्थी ५०० रुपये दंड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व सामान्य नागरिकांसह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही मुलुंडमधील हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी केली आहे. मात्र पालिकेकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी गेल्या चार दिवसांपासून येथे साखळी उपोषण सुरू केले आहे. तसेच झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी सोमवारी सायंकाळी येथे घंटानाद करण्यात आला. जोपर्यंत सरकार या प्रकल्पाचे काम थांबवत नाही. तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील. यापुढे आमरण उपोषणालाही बसण्याची आमची  तयारी आहे, असा इशारा आंदोलनकर्ते आणि वकील सागर देवरे यांनी दिला आहे.