scorecardresearch

आम्ही कधी उद्धव ठाकरेंचा रिपोर्ट मागितला का?; MRIचे पुरावे मागणाऱ्या शिवसेना नेत्यांना नवनीत राणांचा सवाल

लीलावती रुग्णालय तोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले तर नवल वाटणार नाही, असेही नवनीत राणा म्हणाल्या

Question of Navneet Rana to Shiv Sena seeking proof of MRI

अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयाच्या एमआयआर कक्षातील फोटो समोर आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार  मनिषा कायंदे आणि शिवसेना नेत्यांनी सोमवारील लीलावती रुग्णालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. नवनीत राणा यांचे एमआयआर स्कॅन सुरु असताना फोटो कोणी काढला असा सवाल शिवसेना नेत्यांनी उपस्थित केला. याबबात पोलिसांत तक्रार करणार असल्याची माहिती आमदार मनिषा कायंदे यांनी दिली. त्यानंतर दिल्लीत पोहोचलेल्या नवनीत राणा यांनी याबाबत भाष्य केले आहे.

 “मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता असल्याने गैरवापर केला जात आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या घरावर कारवाई करण्यात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या लीलावतीमधील बाकीच्या रुग्णांच्या घराचीही मोजमापणी करु शकतात. लीलावती रुग्णालय तोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले तर नवल वाटणार नाही. कारण त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण रुग्णालापर्यंत पोहोचले आहे,” असे नवनीत राणा टिव्ही९ सोबत बोलताना म्हणाल्या.

“आम्ही अशा फालतू…”; नवनीत राणांच्या आव्हानानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

“मी लीलावतीमध्ये एमआरआय केला आहे. दोन वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत म्हणून आम्ही कधी उद्धव ठाकरेंचा रिपोर्ट मागितला का? आधी त्यांनी त्यांचे रिपोर्ट द्यावे मग मला रिपोर्ट मागावा. मी सर्व रिपोर्ट पुराव्यसह देईन. कोणाच्या खासगी रिपोर्ट मागणे सरकारचे काम नाही,” असे नवनीत राणा म्हणाल्या.

शिवसेना नेते लिलावती रुग्णालयात जाऊन धडकले होते. त्यांनी रुग्णालय प्रशासनास विविध प्रश्न विचारून जोपर्यंत याचे उत्तर दिले जात नाही तोपर्यंत आम्ही रुग्णालयातून हलणार नसल्याची भूमिका घेतली होती. नवनीत राणा यांचा खरच एमआरआय झाला आहे का?, एमआरआय करताना फोटो कसे काढले गेले? रुग्णलायाचे नियम सर्वांना समान हवेत. त्यांचा तपासण्यांचा रिपोर्ट मिळेपर्यंत आम्ही जाणार नाहीत, असं म्हणत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Question of navneet rana to shiv sena seeking proof of mri abn

ताज्या बातम्या