मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकल, प्रथम श्रेणीच्या डब्यातील विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढल्याने, तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोयीचा होते. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांना प्रवास करण्यापासून अटकाव करण्यासाठी रोजच्या तिकीट तपासणीसह भरारी पथके कार्यरत आहेत. याद्वारे एप्रिल महिन्यात केलेल्या कारवाईतून २० हजार विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. त्यातून मध्य रेल्वेने ८६ लाखांचा दंड वसूल केला.

हेही वाचा >>> मुंबई : चार लोकलवर दगडफेक,आरोपीला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. गर्दीच्यावेळी प्रवाशांना अधिकची रक्कम मोजूनही वातानुकूलित लोकलमध्ये बसण्यासाठी जागा मिळत नव्हती. त्यात अनेक विनातिकीट प्रवाशांची गर्दीही वाढली होती. प्रथम श्रेणी डबा, वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासणी जास्त प्रमाणात होत नसल्याने विनातिकीट प्रवाशांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले होते. ही घुसखोरी कमी करण्यासाठी दररोजची तिकीट तपासणी कडक करून, तिकीट तपासनिसांचे भरारी पथक प्रत्येक रेल्वे स्थानकात, प्रत्येक लोकलच्या डब्यात जाऊन तपासणी करू लागले. यातून मुंबई विभागाने एप्रिलमध्ये २० हजार ७६० विनातिकीट प्रवासी आढळून आले. याद्वारे ८६ लाख १८ हजार ८२८ रुपयांचा दंडवसुली केली.

द्वितीय श्रेणीच्या तिकीटावर प्रथम श्रेणी प्रवास – १२,२१३

वातानुकूलित लोकलमधील विनातिकीट – २,८०५

विनावातानुकूलित प्रथम श्रेणीतील विनातिकीट – ५,७४२