ठाणे ते दिवा पाचवी, सहावी मार्गिका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी येत्या शनिवारी मध्यरात्रीपासून १४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. २२ जानेवारीच्या मध्यरात्री १.२० वाजल्यापासून ते रविवार, दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे ते दिवा डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. याच कालावधीत रविवारी अप मार्गावरही दुपारी साडेबारा वाजल्यापासून ते दुपारी अडीच वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

ब्लॉक कालावधीत दिवा ते ठाणे दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर गाड्या धावतील. दादर येथून २२ जानेवारीला रात्री ११.४० पासून ते २३ जानेवारीपर्यंत मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सुटणाºया जलद उपनगरी व मेल आणि एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते कल्याण डाउन धिम्या मार्गावर वळविल्या जातील. डाऊनच्या एक्स्प्रेस गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २३ जानेवारीला पहाटे दोन वाजल्यपासून ते ब्लॉक अवधी पूर्ण होईपर्यंत कल्याणकडे जाणाºया उपनगरीय व एक्स्प्रेस गाड्या मुलुंड ते कल्याण दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.

’ कल्याणकडे जाणाºया मेल व एक्स्प्रेस गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत. ठाण्यातील प्रवाशांना दादर, कल्याण आणि पनवेल स्थानकांवरून संबंधित गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी आहे.

’ कोकणाकडे जाणाºया डाऊन मेल एक्स्प्रेस गाड्या ठाणे येथे प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर थांबतील आणि पुढे जातील.

’ ब्लॉकनंतर, कल्याणकडे जाणाºया डाऊन जलद उपनगरीय व एक्स्प्रेस गाड्या ठाणे फलाट क्रमांक पाच मार्गे ठाणे ते दिवा विभागातील नवीन डाऊन जलद नवीन मार्गावरून कळवा आणि मुंब्रा स्थानकांमधून धावतील.

’ ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनसहून पनवेलकडे जाणाºया डाऊन गाड्या डाऊन जलद मार्गावरून किंवा पाचव्या मार्गावरून ठाणे येथे प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर येतील आणि नवीन पाचव्या मार्गाने (पूर्वीचा डाऊन जलद मार्ग) पारसिक बोगद्यामधून जातील.

गाडी क्रमांक ११००३ दादर ते सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस न वळविता आपल्या नियोजित डाऊन जलद मार्गाने व आपल्या नियोजित थांब्यांसह धावणार आहे. २३ जानेवारीला मध्यरात्री बारानंतर लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाºया व कल्याणकडे जाणाºया डाऊन एक्स्प्रेस गाड्या मुलुंड ते कल्याण डाऊन धिम्या मार्गावर वळविल्या जातील. या गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत. 

२३ जानेवारीला एक्स्प्रेस गाड्या रद्द  

मुंबई ते पुणे ते मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस

मुंबई ते करमाळी ते मुंबई तेजस एक्स्प्रेस

मुंबई ते पुणे ते मुंबई डेक्कन एक्स्प्रेस

मुंबई ते नांदेड तपोवन एक्स्प्रेस

मुंबई ते जालना ते मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस

गाडी क्रमांक ११०२९ मुंबई ते कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस

१२१३९ मुंबई ते नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस

२२ जानेवारीला एक्स्प्रेस गाड्या रद्द  

१७६१८ नांदेड  ते मुंबई तपोवन एक्स्प्रेस

११०३० कोल्हापूर  ते मुंबई कोयना एक्स्प्रेस

१२१४० नागपूर ते मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway line 14 hour megablock on sunday thane to diva akp
First published on: 20-01-2022 at 00:52 IST