मुंबई : नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी बहुसंख्य नागरिक पर्यटनस्थळी गेले आहेत. रेल्वेने प्रवास करून प्रेक्षणीय स्थळ गाठले आहे. परंतु, ऐन वर्षाअखेरीस रेल्वेचे तिकीट काढणे, तिकीट आरक्षित करण्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, प्रवाशांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री दोन तास प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) बंद करण्यात येणार असून या कालावधीत ही यंत्रणा अद्ययावत करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> राज्यातील १३ रेल्वे स्थानकांत फलाट तिकीट विक्रीवर निर्बंध, गर्दीचा भार कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) ३१ डिसेंबर रोजी रात्री ११.४५ ते १.१५ या कालावधीत बंद करण्यात येणार आहे. यावेळी रेल्वे गाड्यांचे क्रमांक अद्ययावत करण्यात येणार आहेत. पीआरएस बंद कालावधीत परतावा, इंटरॲक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम (आयव्हीआरएस), चार्ट डिस्प्ले, तात्काळ आरक्षण या सेवा उपलब्ध नसतील. याशिवाय इंटरनेट ऑनलाइन आरक्षण सुविधा उपलब्ध होणार नाही. तथापि, रिफंड नियमांनुसार परताव्यासाठी तिकीट जमा पावती (टीडीआर) जारी केले जाईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. या कालावधीत तिकिटे काढता येणार नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होईल.