महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. हे दोघेही एका मंचावर आले आणि अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या स्पष्टपणे बोलण्याच्या स्वभावाचा उल्लेख करत पाच नेत्यांची नावं घेतली. तसेच स्पष्टवक्ते राज ठाकरे या पाच नेत्यांना काय सल्ला देणार? असा थेट प्रश्न राज ठाकरेंना केला. अमृता फडणवीस यांच्या या प्रश्नावर राज ठाकरेंनीही जोरदार टोलेबाजी केली. ते बुधवारी (२६ एप्रिल) लोकमतने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आपल्या स्वभावावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मला राग फार पटकन येतो. तो राग तितक्याच पटकन मावळतोही, पण राग येतो. मला कित्येकदा आमच्या पक्षातील लोक म्हणतात की, जरा कमी स्पष्ट बोला.”

अमृता फडणवीसांचे थेट प्रश्न, राज ठाकरेंचे परखड उत्तरं

राज ठाकरेंनी ते स्पष्टपणे बोलत असल्याचं म्हटल्यावर अमृता फडणवीसांनी ‘तुम्ही स्पष्ट बोलता असं म्हणाले, मग मी काही लोकांची नावं घेईन त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?’ असा प्रश्न राज ठाकरेंना विचारला.

अमृता फडणवीस – एकनाथ शिंदे
राज ठाकरे – जपून राहा

अमृता फडणवीस – देवेंद्र फडणवीस
राज ठाकरे – वरती संबंध नीट ठेवा

अमृता फडणवीस – अजित पवार<br>राज ठाकरे – मला ५ तारखेच्या माझ्या रत्नागिरीतील सभेत सविस्तर बोलायचं आहे. एका वाक्यात बोलायचं नाही, पण अजित पवार बाहेर जेवढं लक्ष देत आहेत तेवढंच त्यांनी काकांकडेही लक्ष द्यावं.

अमृता फडणवीस – उद्धव ठाकरे<br>राज ठाकरे – उद्धव ठाकरेंना काय सांगणार मी, ते स्वयंभू आहेत.

अमृता फडणवीस – आदित्य ठाकरे<br>राज ठाकरे – तेच ते.

हेही वाचा : अमृता फडणवीसांचा अजित पवारांना टोला, म्हणाल्या, “ते लोक खूप ठिकाणी डोळे मारतात, त्यामुळे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर अमृता फडणवीस राज ठाकरेंना म्हणाल्या, “तुम्ही म्हणालात की देवेंद्र फडणवीसांनी जरा वर लक्ष दिलं पाहिजे, तसं त्यांनी घरीही लक्ष दिलं पाहिजे. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे.” यावर राज ठाकरे म्हणाले, “मला तुमच्या घरच्या प्रश्नांमध्ये आणू नका. मला जेव्हा तुम्ही मुलाखत घेणार हे समजलं…”