महाराष्ट्राची प्रतिकृती असलेला केक कापून वाढदिवस साजऱ्या करणाऱ्या श्रीहरी अणे यांना हा दिवस कायमचा लक्षात राहील, असा धमकीवजा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. महाराष्ट्राचे केक कापून दोन तुकडे केलेला वाढदिवस अणे आयुष्यभर लक्षात ठेवतील, असे राज यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता अणेंना मनसे कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गुढीपाडव्या मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी श्रीहरी अणेंवर सडकून टीका केली होती. अणेंसारख्या लोकांना महाराष्ट्राचे तुकडे करायला तो वाढदिवसाचा केक वाटला काय, असे वक्तव्य केले होते. त्यामुळेच राज ठाकरेंना दाखवण्यासाठी आपण हा केक कापत असल्याचे सांगत अणेंनी यावेळी राज यांना आव्हान दिले. अणेंच्या या कृतीवर शिवसेनाही संतप्त झाली असून हिम्मत असेल तर अणेंनी गुजरातचा असा केक कापून दाखवावा असा टोलाही शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी लगावला आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमची चळवळ सुरुच ठेवू असे श्रीहरी अणे यांनी सांगितले. अणेंच्या या कारनाम्यावर मनसेने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. अणेंना चोपूनच काढले पहिजे. केक सारखे अणे यांना देखील कापले पाहिजे. मनसे अणेंना आपल्या स्टाईलने उत्तर देईल अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे गटनेता संदिप देशपांडे यांनी दिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2016 रोजी प्रकाशित
अणेंना हा वाढदिवस कायमचा लक्षात राहील- राज ठाकरे
महाराष्ट्राचे केक कापून दोन तुकडे केलेला वाढदिवस अणे आयुष्यभर लक्षात ठेवतील,
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-04-2016 at 21:53 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray warns shri hari aney over separate vidarbha cake cutting