केंद्रात व राज्यातील सत्तेत योग्य वाटा मिळावा, यासाठी खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने पुन्हा जोर धरला आहे. रिपाइंच्या वतीने मंगळवारी सायंकाळी गोवंडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत या सभेच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. भाजपने रिपाइंशी युती करताना आठवले यांना मंत्रिपदे, आमदारकी व महामंडळांवर प्रतिनिधित्व देण्याचे लेखी आश्वासन दिले होते; परंतु आठवले व त्यांच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग मिळालेला नाही.