scorecardresearch

Premium

‘मनरेगा’साठी १२६६ कंत्राटी अभियंत्यांची भरती

नियोजन विभागाने बाह्य यंत्रणेद्वारे भरती करण्याचा निर्णय घेतला असून राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) राबवण्यासाठी १२६६ कनिष्ठ अभियंत्यांना (तांत्रिक सहायक) भरती केले आहे.

jobs in india
(फोटो क्रेडिट- प्रातिनिधिक)

मुंबई : नियोजन विभागाने बाह्य यंत्रणेद्वारे भरती करण्याचा निर्णय घेतला असून राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) राबवण्यासाठी १२६६ कनिष्ठ अभियंत्यांना (तांत्रिक सहायक) भरती केले आहे. नियोजन विभागाने रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘मनरेगा’च्या राज्य नियामक मंडळाच्या बैठकीत बाह्यसंस्थेद्वारे भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर १८ मे २०२३ च्या परिपत्रकान्वये नियोजन विभागासाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळाची सेवा ‘मे. एस.टु.इन्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेड‘ या कंपनीची नेमणूक केली. या कंपनीने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मनरेगाच्या कामासाठी १२६६ ‘तांत्रिक सहायकां’ची भरती केली आहे. या सहायकांचे ऑगस्ट २०२३ च्या  वेतनापोटी चार कोटी ९२ लाख ३४ हजार ८४० इतकी रक्कम या कंपनीला देण्यात आली आहे. याची देयके सहायक लेखा अधिकारी यांनी काढली आहेत. या तांत्रिक सहायकांना महिन्यांला ४०,००० रुपये इतके वेतन ठरलेले आहे.

Nirmala Sitharaman asserted that the government has succeeded in delivering social schemes to the intended beneficiaries
सामाजिक योजना इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात सरकारला यश – सीतारामन
freshwater fish farming increasing in india
देशात गोड्या पाण्यातील मासेमारीत वाढ महाराष्ट्र मात्र पिछाडीवर
The Chief Minister Secretary sent a letter to the PMRDA regarding the cancellation of the meeting regarding the development plan pune
पुणे: मुख्यमंत्र्यांचा पीएमआरडीएला पुन्हा ‘खो’
Mumbai Highcourt
“मग मुंबईचे रस्ते बंद करावेत का?”, कर्मचाऱ्यांना मराठा आरक्षण सर्वेक्षणात जुंपल्याने HC ने मुंबई पालिकेला फटकारले

आर्थिक लाभ सहायकांचे वेतन, कंपनींचे शुल्क आदींचा विचार केला तर १२६६ सहायकांच्या मानधनासाठी ३,५०,६३,४२७  रुपये, भविष्य निर्वाह निधीत ५५,४८,२४५ रुपये, व्यवसाय कर तर भरती करणाऱ्या कंपनीला ८३,६९,९२३ रुपये अशी चार कोटी ९२ लाख ३४ हजार ८४० रुपये पहिल्या महिन्याचे देयक काढले आहे. यामध्ये कंपनीला ८३ लाखांपेक्षा जास्त आर्थिक लाभ होत आहे. नियोजन विभाग आणि भरती करणाऱ्या कंपनीच्या दरम्यान झालेल्या करारातील तरतुदीनुसार कंपनीस १६ टक्के इतके शुल्क म्हणून देण्यात येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Recruitment of 1266 contract engineers for mnrega mumbai print news ysh

First published on: 08-10-2023 at 00:07 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×