मुंबई: विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात मार्च महिन्यात महाविकास आघाडीच्या वतीने आणण्यात आलेल्या अविश्वास ठरावाचे काय झाले, त्याची सद्यस्थिती काय आहे, असा सवाल शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार ॲड. अनिल परब यांनी केला. त्यावर त्या ठरावाची सद्यस्थिती लवकरच सांगितली जाईल, असे सभापती राम शिंदे यांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या गोऱ्हे यांनी पक्षांतर केले असल्याने पक्षांतरबंदी कायद्यान्वये त्यांना अपात्र ठरविण्यासाठी पुरेस आहे. . हा ठराव विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या दहा सदस्यांनी दिला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात डाॅ. गोऱ्हे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला गेला आहे. या ठरावाचे तीन महिने झाले. त्याचे काय झाले असा प्रश्न परब यांनी विचारला. सर्वसाधारपणे ९० दिवसात सभापतींनी यावर निर्णय देणे अपेक्षित आहे. असे परब यांनी सांगितले.