मुंबई : अंधेरी पूर्व येथील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी सकाळी मंजूर केला. सकाळी कार्यालय सुरू होताच लटके यांनी सामान्य प्रशासन विभागात जाऊन स्वीकृती पत्राची प्रत स्वीकारली.

हेही वाचा >>> “पावसकर तुम्हाला एकदा थोबाडीत बसली आहे, त्यामुळे…”; उद्धव ठाकरेंबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावरून पेडणेकरांचा इशारा

हेही वाचा >>> देशमुख यांनी पदाचा दुरूपयोग करून आर्थिक गुन्हे केल्याने ते जामीनास अपात्र; जामिनाला विरोध करताना सीबीआयचा विशेष न्यायालयात दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरीतील के-पूर्व विभाग कार्यालयातील सेवेत ऋतुजा लटके कार्यरत होत्या. गेली १४ वर्षे त्या पालिकेच्या सेवेत आहेत. निवडणूक लढवण्यापूर्वी त्यांना आपल्या कार्यकारी सहाय्यक (लिपीक) पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र त्यांच्या राजीनाम्याच्या पत्रावरून तांत्रिक बाब उपस्थित करीत प्रशासनाने त्यांचा राजीनामा मंजूर केला नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाचा दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. सलग तीन दिवस ऋतूजा लटके यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ठाण मांडून होते. मात्र प्रशासनाने दाद न दिल्यामुळे अखेर लटके यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महानगरपालिकेला फटकारतानाच लटके यांच्या बाजूने निकाल दिला होता. राजीनामा तातडीने स्वीकारावा व तसे पत्र त्यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत द्यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेने शुक्रवारी सकाळी स्वीकृती पत्र लटके यांना दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपला राजीनामा १३ ऑक्टोबरपासून कार्यालयीन वेळेनंतर स्वीकृत करण्यात येत असल्याचे या स्वीकृती पत्रात म्हटले आहे.