केंद्रात सत्तांतर घडवून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंत्रणाही जोरदार कामाला लागली असून मतदार यादीत नावनोंदणी मोहीम हाती घेण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. मोदींबद्दल आकर्षण असलेल्या तरुणवर्गासह भाजपकडे कल असलेल्या सर्वाची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी संघ आणि भाजपनेही दोन आठवडय़ांची मोहीम हाती घेतली.
मतदारांची नाव नोंदणी आणि मतदारयादी प्रसिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाने ३१ जानेवारीपर्यंत मुदत वाढविली आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातही भाजपला अनुकूल असलेल्या मतदारांची नावे मोठय़ा प्रमाणावर यादीत समाविष्ट व्हावीत, यासाठी संघ सक्रिय झाला असून कार्यकर्त्यांना ‘दक्ष’ राहण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये कधीही यापद्धतीने संघ यंत्रणेने पुढाकार घेतलेला नव्हता.
जनकल्याण बँकेसारख्या संघ परिवारातील संस्थांची मदत घेऊन एसएमएस व अन्य माध्यमांद्वारे नाव नोंदणीसाठी आवाहन केले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कार्यकर्ते त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2014 रोजी प्रकाशित
‘नमो विजया’साठी संघाची मतदार नोंदणी मोहीम
केंद्रात सत्तांतर घडवून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंत्रणाही जोरदार कामाला लागली असून मतदार
First published on: 20-01-2014 at 02:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss sets voter registration campaigning for namo victory