मुंबई : राज्य सरकारच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे वाहतूक सेवा पुरवल्याबद्दल रॅपिडो आणि उबर बाईक टॅक्सीविरुद्ध मंगळवारी आझाद मैदान पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) केलेल्या तक्रारीवरून दोन्ही कंपन्यांविरुद्ध बीएनएसच्या कलम ३१८ (३) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिलमध्ये आरटीओने याप्रकरणी रॅपिडोला नोटीस बजावली होती. परिवहन आयुक्तांनी दोन्ही अॅप आधारित अॅग्रीगेटर्सविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारीनुसार, परिवहन विभागाची कुठलीही परवानगी न घेता रॅपिडो आणि उबर बाईक अॅपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे अवैध प्रवासी वाहतूक होत आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ९३ मधील तरतुदीनुसार मोटार व्हेईकल अग्रीगेटर गाईडलाईन्स २०२० नुसार अॅप बेस प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी घेणे बंधनकारक असताना सदर कंपन्यांकडून अशा कुठल्याही तरतुदींचे पालन न करता विना परवानगी प्रवासी वाहतूक सुरू होती. त्यांच्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.