मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस व चौघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता सलमान खानवर चालविण्यात येणाऱ्या खटल्याचा निकाल देण्यापूर्वी या खटल्यात चुकीची साक्ष नोंदविणाऱया पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱया याचिकेवर निर्णय देण्यात येईल, असे गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याप्रकरणी न्यायालयामध्ये अर्ज दिला आहे. हिट अॅंड रन प्रकरणात पोलीसांनी साक्षीदार कमाल खान याची साक्ष नोंदवलीच नाही. अपघात घडला, त्यावेळी ते सलमान खानबरोबर गाडीमध्ये उपस्थित होते, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन करणाऱया डॉक्टरांऐवजी दुसऱयाच डॉक्टरांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली, असाही आरोप त्यांनी आपल्या अर्जामध्ये केला आहे.
कमाल खान यांची साक्षच न्यायालयात न नोंदवून पोलीसांनी आरोपीच्या कृत्यावर एकप्रकारे पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप संतोष दौंडकर यांच्या वकील आभा सिंग यांनी न्यायालयात केला.
न्या. डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी आभा सिंग यांना त्याचा युक्तिवाद लिखीत स्वरुपात देण्याचे आदेश दिले असून, या खटल्याचा निकाल देण्यापूर्वी त्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2015 रोजी प्रकाशित
हिट अॅंड रन प्रकरण : पोलीसांवर कारवाईसाठी न्यायालयात अर्ज
सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी याप्रकरणी न्यायालयामध्ये अर्ज दिला आहे.
First published on: 23-04-2015 at 05:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan hit and run case court to decide perjury application on may