मुंबई : बनावट कागदपत्रांद्वारे मद्यालयासाठीचा परवाना मिळवल्याबद्दल ठाणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी आणि रद्द केलेला परवाना पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेत दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या. त्यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी वानखडे यांचा मद्यालयाचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला. वानखेडे यांनी सज्ञान नसताना म्हणजेच अवघ्या सतराव्या वर्षी त्यांच्या नावाने मद्यालयाचा परवाना काढला होता, ही बाब चौकशीत समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली होती. या निर्णयाला वानखेडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.

एनसीबीत कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केल्याचा सूड उगवण्यासाठी  आपल्याविरोधात ही करण्यात आल्याचा दावा वानखेडे यांनी याचिकेत केला आहे. वानखेडे यांनी अटकेपासून संरक्षण देण्याची मागणीही केली आहे.

हमीचे उल्लंघन नाही- मलिक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी आपल्याविरोधात खोटी अवमान याचिका दाखल केली आहे, तसेच आपण न्यायालयात दिलेल्या हमीचे उल्लंघन केलेले नाही. न्यायालयाने दिलेल्या सवलतीतच आपण समीर यांच्याबाबत वक्तव्य केल्याचा दावा मलिक यांनी सोमवारी उच्च न्यायालयात केला. मलिक यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे हा दावा केला. मलिक यावेळी स्वत: न्यायालयात हजर होते.