शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेचे आमदार आहे. या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांची ताकद अलिकडच्या काळात वाढली असल्याचं पहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत म्हणजेच २०२४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात आदित्य ठाकरेंसमोर मनसेचं आव्हान निर्माण होऊ शकतं. कारण मनसे नेते आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे वरळीतून विधानसभेची निवडणूक लढू शकतात.

संदीप देशपांडे यांनी वरळी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, टीव्ही ९ मराठीने संदीप देशपांडे वरळी विधानसभेची जागा लढवू शकतात अशी शक्यता वर्तवली आहे. संदीप देशपांडे यांनी आज (१९ मार्च) वरळीतल्या बीडीडी पुनर्विकासातील रहिवाशांसोबत संवाद साधला. यावेळी शेकडो रहिवासी उपस्थित होते.

हे ही वाचा >> दिल्लीतलं वातावरण तापलं, पोलीस राहुल गांधींच्या घरी दाखल; चौकशीबाबत विचारताच म्हणाले, “थोडा वेळ…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेचा बालेकिल्ला

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी आदित्य ठाकरे या मतदार संघातून विजयी झाले. गेल्या अनेक वर्षांपासून हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. १९९० ते २००९ या काळात शिवसेनेचे दत्ताजी नलावडे येथील आमदार होते. २००९ मध्ये ही जागा काँग्रेसच्या सचिन अहीर यांनी जिंकली. तर २०१४ मध्ये ही जागा पुन्हा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी वरळीत भगवा फडकवला. तर २०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी तब्बल ८९,२४८ मतांसह मोठा विजय मिळवला. येथे राष्ट्रवादीच्या सुरेश माने यांना केवळ २१ हजार मतं मिळाली होती.