उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेले दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चित्रपट निर्मात्यासह अभिनेत्यांची भेट घेतली. मात्र, त्यांच्या या भेटींनंतर मुंबईमधील चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशला नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या असतानाच याबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे.

हेही वाचा – “थेट शूट करण्याऐवजी माझा अपघात घडवून आणला जाऊ शकतो,” सुषमा अंधारेंच्या विधानामुळे खळबळ

संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?

संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत बॉलीवूड आणि मुंबई हे अतूट नातं असल्याचे म्हटलं आहे. तसेच चित्रपटसृष्टीची सुरुवात दादासाहेब फाळके यांनी केली असून चित्रपट उद्योग हा काही हलवा नाही, जो डब्यात घालून नेता येईल. त्यामुळे चिंता नसावी, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योगी अदित्यनाथ यांनाही दिली प्रतिक्रिया

दरम्यान, याबाबत काल (५ जानेवारी) उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रतिक्रिया दिली होती. “मुंबई ही मुंबई आहे. हे शहर अर्थभूमी आहे. तर उत्तर प्रदेश राज्य हे धर्मभूमी आहे. या दोघांचा सुंदर संगम होऊ शकतो. मुंबईतील फिल्मसिटी घेऊन जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. मात्र आम्ही आमची स्वत:ची फिल्मसिटी उभारत आहोत,” असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते.