महाराष्ट्र सरकारने अलीकडेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार सोहळा रखरखत्या उन्हात आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकावर जोरदार टीका केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – Maharashtra Breaking News Live : “राज्यातील जनमत भाजपा-शिंदेंच्या केमिकल लोच्याविरोधात, हिंमत असेल तर…”; संजय राऊतांची खोचक टीका!

man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
Sunetra Pawar campaign started at Maruti Mandir in Kanheri in Baramati.
विकास त्यांनीच केला काय? बारामतीमधील कामांवरून अजित पवार यांचा सवाल; शरद पवार यांच्यावर टीका
Chandrasekhar Bawankule
“बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले
Shahu Maharaj
शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार

काय म्हणाले संजय राऊत?

“आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देताना जी अराजक परिस्थिती निर्माण झाली. त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याला सरकारचे ढिसाळ नियोजन जबाबदार आहे. त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा मागायला पाहिजे. राज्यात १४ निरपराध लोकांचे बळी गेले. मात्र, सरकारकडून साधी संवेदनाही व्यक्त होत नाही. हे दुर्देवी आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा – “बरं झालं अजित पवारांनीच हे कारस्थान उधळून लावलं, त्यामुळे…”; बंडखोरीच्या चर्चेवरून ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल!

“…तर फडणवीसांनी धुडगूस घातला असता”

“देवेंद्र फडणवीस जर आता विरोधी पक्षनेते असते, तर त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात जाऊन धुडगूस घातला असता आणि सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करूनच ते बाहेर पडले असते. मात्र, आज ते गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे. म्हणून त्यांनी आता जुन्या फडणवीसांना जागवून मुख्यमंत्री शिंदेचा राजीनामा घ्यावा”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra Breaking News Live : दुपारच्या वेळी मोकळ्या जागेवर कार्यक्रम न घेण्याचा सरकारचा निर्णय, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर..

“मुख्यमंत्री सुरुवातीपासून आकडे लपवत”

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. “मुख्यमंत्री सुरुवातीपासून आकडे लपवत आहेत. त्यांचा पोलीस आणि प्रशासनावर दबाव आहे. ज्या दिवशी ही दुर्घटना घडली, त्याच दिवशी हा आकडा १४ पर्यंत पोहोचला, असं स्थानिक लोक सांगत होते. पण एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्यावर दबाव टाकून हा आकडा सहा ते सातच सांगा, असे निर्देश दिले”, असं ते म्हणाले.