दिवाळीसाठी मातीचा किल्ला बनवताना विजेचा धक्का लागल्याने कल्याण येथील एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. अंकित लोणकर (वय १२, रा. राधेश्याम अपार्टमेंट, हनुमान नगर, कल्याण पूर्व) असे या मुलाचे नाव आहे.
दिवाळीची सुटी असल्याने अंकित हा गुरूवारी (दि. २७) सांयकाळी आपल्या मित्रांसमवेत मातीचा किल्ला बनवत होता. त्यावेळी विजेचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला. अंकितच्या मृत्यूचा त्याच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला. अंकितला एक लहान बहिण आहे. ऐन दिवाळीतच अशी घटना घडल्याने लोणकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने हनुमान नगर परिसरात शोककळा पसरली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Oct 2016 रोजी प्रकाशित
किल्ला बनवताना विजेचा धक्का बसल्याने कल्याणमधील शाळकरी मुलाचा मृत्यू
ऐन दिवाळीतच ही दुर्दैवी घटना घडल्याने लोणकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 28-10-2016 at 14:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School boy dies due to electric shock in kalyan