राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व हिंदुस्थान समाचार या बहुभाषी वृत्तसंस्थेचे समन्वयक श्रीकांत शंकर जोशी यांचे मंगळवारी पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.श्रीकांत जोशी मूळ गिरगावातील. तरुणपणीच ते संघाचे प्रचारक (पूर्णवेळ कार्यकर्ते) झाले. प्रथम नांदेड येथे काही काळ संघकाम केल्यानंतर पुढे सुमारे २५ वष्रे आसाममध्ये ते कार्यरत होते. आसाममध्ये फुटीरतावादी चळवळीतून निर्माण झालेल्या अशांततेतही राष्ट्रीय भावना जोपासण्यामध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या संघकार्यकर्त्यांमध्ये श्रीकांतजींचे नाव प्रामुख्याने आहे. आसाममध्ये अनेक संस्थांना पाठबळ देत त्यांनी संपूर्ण ईशान्य भारतात राष्ट्रवादी विचारसरणीची युवापिढी घडविली.
श्रीकांतजी जोशी यांनी संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही सुमारे १५ वष्रे काम पाहिले. बाळासाहेबांच्या अखेरच्या काळात श्रीकांतजींनी त्यांची सावलीसारखी साथ केली. संघामध्ये प्रचार विभाग सुरू झाल्यापासून ते त्याच्याशी संबंधित होते. पुढे ते अखिल भारतीय प्रचार प्रमुखही झाले. या काळात विश्व संवाद केंद्र या संस्थेची स्थापना त्यांनी केली.
देशी प्रसारमाध्यमांवरील इंग्रजी भाषेचा पगडा दूर करून त्यांना भारतीय भाषांमध्ये वृत्तसेवा पुरविणाऱ्या ‘हिंदुस्तान समाचार’ या वृत्तसंस्थेचे पुनररुजीवन करण्यात श्रीकांतजींनी मोलाची भूमिका बजावली होती. आज या संस्थेतर्फे १७ भाषांमध्ये अनेक प्रसार माध्यमांना वृत्तसेवा दिली जाते. त्यांच्या निधनाबद्दल संघ व संबंधित संस्थांच्या अनेक अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2013 रोजी प्रकाशित
संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्रीकांतजी जोशी यांचे निधन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व हिंदुस्थान समाचार या बहुभाषी वृत्तसंस्थेचे समन्वयक श्रीकांत शंकर जोशी यांचे मंगळवारी पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.श्रीकांत जोशी मूळ गिरगावातील. तरुणपणीच ते संघाचे प्रचारक (पूर्णवेळ कार्यकर्ते) झाले.
First published on: 09-01-2013 at 03:23 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior rss pracharak shrikant joshi passes away