१४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी ५५ वर्षीय मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलीचे प्रेमसंबंध घरी सांगण्याची धमकी देऊन आरोपी मुख्याध्यापकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पीडित मुलीला डिसेंबर २०२२ मध्ये आरोपीने धमकावले होते. तिचे एका मुलाशी असलेले प्रेमसंबंध आईला सांगण्याची धमकी देऊन आरोपीने तिला असभ्यरित्या स्पर्श केला. तसेच लैंगिक अत्याचारही केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. २८ डिसेंबर, २०२२ ते २० जानेवारी, २०२३ या कालावधीत गुन्हा घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा – मुंबई : समृद्धी महामार्गावरील फूड प्लाझा आणि इतर सुविधांसाठी अधिक प्रतीक्षा, एमएसआरडीसीला कंत्राटदार मिळेना

हेही वाचा – INS Vagir पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल, भारताचे समुद्रातले सामर्थ्य वाढले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितल्यानंतर रविवारी मुलीच्या आईने याप्रकरणी नागपाडा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी लैंगिक अत्याचार, विनयभंग, धमकावणे यांच्यासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार मुख्याध्यापकाच्या कार्यालयात हा प्रकार घडला. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.