शक्ती मिल परिसरातील दोन बलात्कार खटल्यातील तीन सामाईक आरोपींची शिक्षा वाढविण्याबाबत ठेवण्यात आलेल्या आरोपावर गुरुवारी सरकारी तसेच बचाव पक्षातर्फे अंतिम युक्तिवाद करण्यात येणार असून त्यानंतर हा आरोप सिद्ध झाला की नाही याचाही निर्णय न्यायालय देण्याची शक्यता आहे.
बचाव पक्षाने पुन्हा पाचारण केलेल्या तीन साक्षीदारांची साक्ष बुधवारच्या सुनावणीत नोंदविण्यात आली. त्यानंतर विजय जाधव या आरोपीनेही आपल्याला आणखी १४ साक्षीदारांना पुन्हा तपासण्याची परवानगी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. परंतु तपास अधिकारी वगळता नव्या आरोपाशी या साक्षीदारांचा काहीही संबंध नसल्याचे सांगत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्याला तीव्र विरोध केला. न्यायालयानेही जाधव यांच्या वकिलांना केवळ तपास अधिकारी वगळता अन्य साक्षीदारांना पुन्हा पाचारण करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आणि त्यांचा त्यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2014 रोजी प्रकाशित
नव्या आरोपावर आज निर्णय अपेक्षित
शक्ती मिल परिसरातील दोन बलात्कार खटल्यातील तीन सामाईक आरोपींची शिक्षा वाढविण्याबाबत ठेवण्यात आलेल्या आरोपावर गुरुवारी सरकारी तसेच बचाव पक्षातर्फे अंतिम युक्तिवाद करण्यात येणार

First published on: 03-04-2014 at 04:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shakti mills gang rape court to rule if accused are repeat offenders