वेगेवगेळ्या पोलीस स्थानाकांमधील तक्रारींच्या आधारे दाखल करुन घेण्यात आलेल्या सर्व एफआयआर बेकायदा असून माझी अटकही बेकायदा आहे, असा दावा अभिनेत्री केतकी चितळेनं केलाय. आपल्याला अटक करताना व्यक्तीस्वातंत्र्याच्या कायद्याचा भंग करण्यात आला असल्याने आपल्याला नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणीही केतकी चितळेनं न्यायालयाकडे याचिकेद्वारे केली आहे.

नक्की वाचा >> शरद पवारांविरोधातील पोस्ट प्रकरणानंतर पहिल्यांदाच केतकी चितळेने केलं भाष्य; हसत म्हणाली, “त्या दिवशी…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी कळवा पोलीस स्थानकाबरोबरच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पोलीस स्थानाकांमध्ये केतकीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. १५ मे पासून म्हणजेच मागील २३ दिवसांहून अधिक काळापासून केतकी अटकेत आहे. याच प्रकरणी तीने आता थेट मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. केतकी प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यात यावी यासाठी आज म्हणजेच मंगळवारी सात जूनरोजी अर्जाद्वारे विनंती करण्यात येणार असल्याचं तिचे वकील घनश्याम उपाध्याय यांनी सांगितलंय.

नक्की पाहा हे फोटो >> केतकी ब्राह्मण असल्याने तिला समर्थन देताय का?; तृप्ती देसाई म्हणाल्या, “पाठिंबा दिल्यास सगळे जातीवर…”

१४ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे कळव्यात एफआयआर दाखल करुन घेतल्यानंतर केतकीला १५ मे रोजी अटक झाली. त्यांतर ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर ती न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.

नक्की वाचा >> केतकी चितळे प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारताच अजित पवारांचा संताप; म्हणाले, “कुणीतरी विकृत व्यक्ती इतक्या घाणेरड्या…”

‘ज्या व्यक्तींनी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केलीय त्यांच्या नावाचा पोस्टमधील कवितेमध्ये उल्लेख नाही. ही कथित आक्षेपार्ह कविता पवार नावाच्या व्यक्तीला उद्देशून आणि त्या व्यतीला दुखावणारी आहे असं गृहित धरलं तरी तक्रार करणाऱ्यांपैकी कोणत्याच व्यक्तीचं नाव पवार नाहीय. या संदर्भात पवार नावाच्या कोणत्याही व्यक्तीने पोलिसांकडे लेखी तक्रार दिलेली नाही. मग पोलीस मला अटक कशी करु शकतात?’, असा प्रश्न याचिकेद्वारे केतकीकडून उपस्थित करण्यात आलेला आहे.

नक्की वाचा >> केतकी चितळे प्रकरण : तृप्ती देसाईंचा केतकीला पाठिंबा; म्हणाल्या, “तिने जी पोस्ट टाकलीय त्यामध्ये पवार…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘माझ्या पोस्टमधील एका कवितेवरुन राज्यातील वेगवगेळ्या पोलीस स्थानकांमध्ये एफआयआर दाखल करायला लावले. पोलीस यंत्रणेला हाताशी धरुन माझ्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई करण्यात आलीय. माझ्याविरोधात एकामागोमाग एक अनेक पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले, यामधून कायदा आणि सत्तेचा गैरवापर होण्याची भीती आहे,’ असाही आरोप केतकीने याचिकेमधून केलाय. दरम्यान उद्या म्हणजेच ८ मे रोजी केतकी चितळेने सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेल्या जामीन अर्जावरही सुनावणी होण्याची शक्यता आहे.