लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: तुळजापूरच्या शेतकरी घरातील शशिकांत दत्तात्रय नरवडे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ४९३ स्थान पटकावले आहे. गावातून शालेय शिक्षण पूर्ण करून अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यानंतर शशिकांतने युपीएससीची तयारी सुरू केली.

तुळजापूर येथे राहणार शशिकांतने आपल्या गावातूनच प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लातूर येथून इलेक्ट्रॉनिक या विषयातून अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. शशिकांतचे वडील एसटी महामंडळात वाहन चालक म्हणून निवृत्त झाले असून आता शेती करतात. आई गृहिणी आहे. तसेच शशिकांतचा मोठा भाऊ डॉक्टर आहे. शशिकांतच्या आई-वडिलांनी अनेक खस्ता खाऊन दोन्ही भावांना शिक्षण दिले.

आणखी वाचा-अमेरिकेतील नोकरी सोडून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न, गौरव कायंदे पाटीलचे युपीएससीत यश

‘मेहनत सार्थकी लागल्याची सध्या माझी भावना आहे. माझ्या पालकांना माझा अभिमान वाटतो आहे. मी या परीक्षेसाठी अनेक प्रयत्न केले होते. आता माझे स्वप्न सत्यात उतरल्यामुळे मी आणि माझे संपूर्ण परिवार खूप खुश आहे, असे शशिकांत याने सांगितले.’

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashikant narwade from tuljapurs farmers family has succeeded in upsc mumbai print news mrj
First published on: 23-05-2023 at 22:59 IST